नेवासा
कल्याण येथुन चोरुन आणलेली टाटा एस गाडी शिताफीने नेवासा पोलीसांनी चोरासह ताब्यात घेवुन कल्याण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 10.08.2023 रोजी 10.00 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे पोलीस स्टेशन नेवासा यांना कल्याण तालुका पोलीस यांचा फोन आला की, कल्याण तालुका गु.र.नं 434 / 2023 भा. दं.वि. कलम 379 प्रमाणे मधील चोरी गेलेली टाटा एस तिचा पासिंग क्रमांक MH 47 AS 0611 ही गाडी खड़का टोलनाका नेवासा येथुन पास झालेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी डोईफोडे यांनी पोसई शैलेंद्र ससाणे, पोना/ किरण गायकवाड, पोकों/सुमित करंजकर, पोकों/शाम गुंजाळ असे पोलीस पथक तयार करुन तात्काळ सदरचे वाहन पकडण्यासाठी खडका टोलनाका येथे रवाना केले असता, सदरचे वाहन नमुद पथकास खडका टोलनाक्याजवळ असलेल्या चहाच्या टपरीसमोर उभे दिसले त्यावरुन पोलीस पथक हे सदर वाहनाच्या जवळ गेले असता, वाहनचालक पोलीसांना पाहुन पळुन जात असताना त्याचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अन्वर लतीफ मन्सुरी रा श्रीरामपुर असे सांगितले त्यानंतर वाहनचालकासह सदरचे वाहन पोलीस स्टेशन नेवासा येथे आणुन कल्याण तालुका पोलीसांना सदरबाबत माहीती देवून सदरचे वाहन हे कल्याण तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे,पोसई शैलेंद्र ससाणे, पोना किरण गायकवाड, पोकों सुमित करंजकर, पोकों शाम गुंजाळ पोलीस स्टेशन नेवासा यांनी केलेली आहे.