नेवासा
सोनई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजु विठ्ठल ब-हाटे ( वय ४८), रा. चांदा रोड, घोडेगांव शिवार, ता. नेवासा हे दिनांक १०/०८/२३ रोजी रात्री कुटूंबियासह झोपलेले असताना घराचे पाठीमागील किचनचा दरवाजा तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने करुन १,९०,०००/- सोन्याचे दागिने रोख व मोबाईल बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले सदर घटने बाबत सोनई पोलीस स्टेशन ३६२ / २०२३ भादविक ३९५, ३९४, ४५२, ५०६, ३४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
दिनेश आहेर यांना पथक नेमुन, गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे,पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, फुरकान शेख, पोकों रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोहेकॉ /संभाजी कोतकर व चापोकों अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक नेवासा, शेवगांव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोनि श्री. आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा आरोपी नामे किरण भोसले रा. एरंडगांव, ता. शेवगांव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह शेवगांव तालुक्यातील एरंडगांव येथे आलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने लागलीच एरंडगांव, ता. शेवगांव येथे जावुन खात्री करता संशयीत आरोपी मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) किरण जयराम भोसले वय ३२, रा. हिंगणगांव, ता. शेवगांव हल्ली २) राहुल जयराम भोसले वय २०, दोन्ही रा. एरंडगांव, ता. शेवगांव ३) भैय्या चेट काळे वय २०, रा. एरंडगांव, ता. शेवगांव व ४) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार नामे ५) सुदास सुदमल काळे रा. गेवराई, ता. नेवासा (फरार) ६) जितीन बाबुलाल ऊर्फ नामदेव चव्हाण रा. पोखरा, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्यांना सोनई पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे किरण जयराम भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द राहुरी पो.स्टे.गु.र.नं. ७१६ / २२ भादविक ३७९, ३४ प्रमाणे चोरीचा तसेच आरोपी नामे राहुल जयराम भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द राहुरी पो.स्टे. गु.र.नं. ७१६/ २२ भादविक ३७९, ३४ प्रमाणे चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक
राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर श्रीमती. स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव सुनिल पाटील
यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.