माय महाराष्ट्र न्यूज:कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला 3 लाख मेट्रीक टन कांदा खुला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन शेतकर्यांना भिती दाखविली आहे.
मात्र नाफेडकडील कांदा साठा हा अवघे काही दिवस पुरेल इतकाच असून यातील कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नाफेडचा कांदा सद्यस्थितीत दर रोखण्यासाठी फारसा
परिणामकारक ठरणार नसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.यंदा जवळपास दिड महिना उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे बाहेरील राज्यातील कांद्याच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा न झाल्यास कांद्याच्या भावात भविष्यात तेजीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.गत आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची तेजी आली आहे.
विशेष म्हणजे कांद्याला राज्यात सर्वाधिक भाव नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मिळात आहे. काल रविवारी राहाता बाजार समिती आवारात क्विंटलमागे 1 नंबरच्या कांद्याला
3300 रूपयांचा भाव मिळाला आहे.त्या खालोखाल पारनेरात कांद्याला 3100 चा भाव मिळाला आहे.शुक्रवारी पारनेर बाजार समिती आवारात 23976 गोणी उन्हाळ कांद्याची आवक झाली होती.
त्यात 300 ते 3500 रूपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. पण काल कांद्याची आवक 23976 गोणीपर्यंत वाढल्याने भाव 300 ते 3100 रूपये पर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समिती आवारात
नंबर एक उन्हाळ कांद्याला 700 ते 3300 रूपयांचा भाव मिळाला. वैजापुरात कांद्याला 300 ते 3000 रूपयांचा दर मिळाला. कोपरगावात 350 ते 2350 रूपयांचा दर मिळाला.