माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. मात्र, जादा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याने आधीच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला होता.
सोबतच, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याची यंत्रणा संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचाही आरोप होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्र ऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र
दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचे दिसत आहे. औरंगाबाद आणि नांदेडच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, केंद्र बदलून देण्याची मागणी होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याची यंत्रणा संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचाही आरोप होत आहे. त्यातच
आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. तलाठी भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र पहिल्याच टप्प्यात परीक्षार्थीचे परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्याने गोंधळ उडाला आहे.
अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्रच दिले गेले नाही. औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील
परीक्षा केंद्र् देण्यात आले आहे. त्यामुळे हे केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केली जात आहे.