नेवासा
भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी चैतन्य टेकणे हा अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च पदवी एम.एस शिक्षणासाठी चैतन्य टेकणे कॅनडास रवाना होत आहे.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी चैतन्यला शुभेच्छा दिल्या.
चैतन्य टेकणे हा भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूल व जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. कोपरगावच्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्यूटर सायन्स विषयातील पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली आहे.
त्यानंतर कॅनडा मधील सुप्रसिद्ध मॅकगिल विद्यापीठामध्ये “एम.एस. इन कॉम्प्यूटर सायंस-रिसर्च मास्टर्स” या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे. हे विद्यापीठ क्यूएस वर्ड युनिव्हर्सिटी रॅकींग २०२३ द्वारे कॅनडातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून घोषीत करण्यात आले आहे . या पदव्युत्तर शिक्षणासाठी चैतन्यला मायटॅक्स या संस्थेकडून पदवीधर शिष्यवृत्ती मिळाली आहे . या शिष्यवृत्तीमध्ये दोन वर्षाची ट्यूशन फी ( शिक्षण फी ) जी भारतीय चलनामध्ये अंदाजे तीस लाख रुपये आहे , माफ होणार आहे .
यावेळी माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी चैतन्य यास मार्गदर्शन केले व आपल्या शिक्षण संस्थेचे नाव देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर असेच उज्वल करा व आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करा असा बहुमोल संदेश ही दिला.
चैतन्य हा श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे माजी प्रशासकिय अधिकारी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित माजी प्राचार्य कै. दिनकरराव टेकणे यांचे नातू असून त्यांचे वडील संतोष टेकणे हे जिजामाता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .
.