Saturday, September 23, 2023

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं पुनरागमन; बहुतांश भागात पाऊस जोर धरणार 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:13 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून, आता महाराष्ट्रात पावसाची नव्यानं

एंट्री होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर काही भागात मात्र ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळू शकतो. पालघर, रायगड, नवी मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान, मान्सूनच्या या नव्या टप्प्याविषयी सांगावं तर, मान्सूनचा पट्टा सध्या उत्तरेकडे म्हणजेच अमृतसर, कर्नाल, मेरठ, लखनौ, साबौर, गोल्परा ते नागालँडपर्यंत सक्रिय असला तरीही पुढील चार-ते पाच दिवसांत तो पुन्हा सर्वसामान्य स्थितीत येईल.

15 ऑगस्टपासून राजच्यात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत असून, पुढेही हे वातावरण कायम राहणार आहे. आयएमडीच्या माहितीनुसार 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचं चित्र आहे.

तिथे विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा सुरु राहील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल.

तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काहीशी उसंत घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळं आणि आयती सुट्टी चालून आल्यामुळं अनेकांनीच पावसाळी सहलींचे बेत आखले आहे. परिणामी

पाऊस नाही असं म्हणून जर तुम्हीही सहलीचा बेत रद्द केला असेल तर पुन्हा हा बेत आखायला काहीच हरकत नाही. किंबहुना अनेकांनी असे बेत आखलेही आहेत. ज्यामुळं राज्याच पावसाळी पर्यटनाला पुन्हा बहर आला आहे.

महाराष्ट्रात पाऊस बेतानं सुरु असला तरीही उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालत आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांचे प्रवाह रौद्र रुप धारण करून वाहत आहेत.

ठिकठिकाणी दरडी कोसळेण्याच्या घटना घडत असल्यामुळं अनेक ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!