माय महाराष्ट्र न्यूज:स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारत राष्ट्र समितीच्या महीला नेत्या अर्चनाताई अंबुरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने धाराशीव शहरातील ईरा पब्लिक स्कूल येथील
शाळेतील मुलांना 150 स्कूल शूज चे वाटप केले. शालेय मुलांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले.पालकांनी आणि शिक्षकांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्याची आज खऱ्या अर्थाने
गरज आहे यावर अर्चनाताईंनी भाष्य केले. तसेच भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ॲड. विश्वजित शिंदे यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत राष्ट्र समितीचे युवा नेते निखिल चांदणे,
ईरा पब्लिक स्कूलचे डायरेक्टर अक्षय गुजर,मुख्याध्यापक पिंपरिकर सर, सर्व शिक्षक वर्ग व पालक इत्यादी उपस्थीत होते.