माय महाराष्ट्र न्यूज:ठाणे कृषी विभागकडून कृषी सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना आपले अर्ज
https://Krushi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांनी ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनुसार ही भरती एकूण २५५ जागांसाठी असणार आहे.
पदाचे नाव – कृषी सेवक.
एकूण रिक्त पदे – २५५
नोकरीचे ठिकाण – ठाणे.
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
खुला प्रवर्ग – १९ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – १९ ते ४३ वर्षे.
पगार – महिना १६ हजार रुपये
निवड प्रक्रिया – परीक्षा.
परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्ग – १००० रुपये.
राखीव प्रवर्ग – ९०० रुपये.
अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन तसेच अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख अद्याप उपलब्ध झालेली नाही.
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Thane%20Division%20ads-2.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.