माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू धर्मात अधिकमास पूजा-पाठ, जप-तपश्चर्या आणि दान यांना फार महत्त्व असतं. यंदा ही अधिकमासातील अमावस्या तीन वर्षांतून एकदा येते. अधिक मासतील
सर्वात मोठी अमावस्या आहे. या दिवशी चुकूनही कोणतीही चूक करू नका, नाहीतर धन, संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी नाहीशी होईल. त्याशिवाय यादिवशी काही उपाय केल्यास एका रात्रीत तुमचं नशिब पालटू शकतं.
श्रावण अधिक महिन्यातील अमावास्येला शुभ कर्माचं पुण्य आयुष्यभर मिळतं असं म्हणतात. आज बुधवार म्हणजे गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे विष्णू आणि गणरायाची पूजा करण्याचा आजची
खास अमावस्या आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील मंदिरात गणेशाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. यानंतर त्यांना शुद्ध पाण्याने स्नान गणरायाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
आता गणेशाला सजवल्यानंतर त्यांना पाले कणेल, जनेयू, दुर्वा, चंदन यांच्या फुलांसह लाडू अर्पण करा.गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करा. धूप-दिवे लावून आरती करा. पूजेत ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा
जप करा. यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वतीला अभिषेक करा. शिवलिंगावर जल अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. जल अर्पण केल्यानंतर दूध अर्पण करा आणि नंतर पाण्याने ते शुद्ध करा.
अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, कणेल फूल, धतुरा, आकृत्यांची फुलं, गुलाब इत्यादी अर्पण करा. यानंतर चंदनाचा तिलक लावावा. महिलांनी पार्वतीला सजवावे आणि देवाला मिठाईचा नैवेद्य दाखवा.
अमावस्येला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करा. माँ लक्ष्मीजींना लाल चुनरीने अपर्ण करा. भगवान विष्णूला चमकदार पिवळे वस्त्र अर्पण करा. या दिवशी ओम नमो भगवते
वासुदेवाय आणि कृष्णाय नमः हा जप करणे शुभ आहे. या दिवशी दान केल्यामुळे पुण्य मिळणार आहे.अमावस्येला पितरांचं धूप-ध्यान करा. गाय, कुत्रे, कावळे यांना घराबाहेर अन्न ठेवा.
मुंग्यांसाठी घराबाहेर साखर ठेवा. अधिक महिन्यात शास्त्र पठणाला विशेष महत्व आहे