माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसांने उसंत घेतली आहे. जुलैअखेर झालेल्या पावसानंतर राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. परंतु शेतकऱ्यांना
दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार हिमालयाच्या दिशेनं वळलेले मान्सून वारे पुन्हा एकदा सामान्य स्थितीत येणार आहे. यामुळे पुढील २४ तासाता राज्यात पावसासाठी पूरक स्थिती
निर्माण होत आहे. पुढील 24 तासांत राज्यात बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भामध्ये पाऊस जोरदार हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झाला आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हिमालयाच्या दिशेनं गेलेले मान्सूनचे
वारे आता पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये येणार असून, महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत: विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल.
एकिकडे विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असतानाच दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागावर असणाऱ्या काळ्या ढगांची चादर कायम राहणार आहे. सध्याच्या घडीला मान्सूनच्या वाऱ्यांची स्थिती पाहता कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत
पट्टा आणि कोमोरिन भागापर्यंतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो सक्रिय असल्याचं हवामान विभागाचं सांगणं आहे. ज्यामुळं राज्याच मान्सून पुन्हा जोर धरताना दिसतोय.मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरामध्ये मात्र पावसाची
रिपरिप पाहायला मिळणार आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीसुद्धा बरसण्याची शक्यता आहे. पण, बहुतांश वेळांना मात्र या भागात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. कोकणातही चित्र काहीसं असंच असेल. ढगाळ वातावरणामुळं
दमट वातावरणाची तीव्रता जाणवणार असून, तापमानात काही अंशांची वाढही नोंदवली जाऊ शकते. थोडक्यात पाऊस परतला असला तरीही त्याचं चकवा देणं मात्र अद्यापही सुरुच आहे.