माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील राहुरीमध्ये ही घटना घडली आहे. पत्नी नूतन सागर साबळे वय २३ वर्षे, तर सासू सुरेखा दिलीप दांगट वय ४५ वर्षे अशी मयतांची नावे आहेत.राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्रीच्या
सुमारास दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने वार करून त्यांची हत्या केली असल्याचा
पोलिसांना दाट संशय आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले.
घटनेनंतर आरोपी सागर फरार झाला आहे. सकाळी दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या भावाने पाहिल्यानंतर घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच
पोलीस घटनस्थळी दाखल झाले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.