Saturday, September 23, 2023

जायकवाडी-संभाजीनगर समांतर योजनेच्या विरोधासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेची सह्यांची मोहिम सुरु

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ प्रतिनिधी

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी समांतर पाणी योजनेला विरोध करण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेने १५ ऑगस्ट पासून सह्यांची मोहिम सुरु केली आहे

याबाबद अधिक माहिती देताना अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले की,
छत्रपती संभाजीनगर शहराला
जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठी समांतर पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे.
खर तर जायकवाडी धरणातील पाणी शेती सिंचना करिता असून ही
शहरांचे पिण्याचे पाणी व एमआयडीसी या बिगरसिंचन कारणासाठी मोठ्या प्रमाणावर
पाणी वापरले जास्त आहे,त्यामुळे शेतकऱ्यांची शेती अडचणीत आलेली आहे.
खर तर तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळावे यासाठी जायकवाडी धरणाची निर्मिति केली.यासाठी जमीनी देऊन शेतकऱ्यांनी त्याग केला.त्याचा विसर सध्या च्या राजकारण्यांना पडलेला आहे.
शहरांना व उद्योगांना जायकवाडी धरनातून नवीन पाणी देते असताना
प्रथम जायकवाडी धरणात पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणून तूट भरून काढण्याची गरज आहे.पण तसे होताना दिसत नाही.

प्रथम जायकवाडी धरणात पाणी आणा आणि मगच समांतरला पाणी योजनेतून पाणी दया अशी आमची भूमिका आहे.
यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेने
जायकवाडी धरणाचे शिल्पकार स्व.शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्या समोर “आधी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मगच समांतर” या आशयाचे घोष वाक्य लिहून १५ ऑगस्ट २०२३ पासून सह्याच्यांची मोहीम सुरु केली आहे. जायकवाडी लाभधारक गावातून संह्यांचे निवेदन राज्य सरकारला पाठवले जाणार आहे. या मागणी बरोबरच एमआईडीसी मधील कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन किंवा सरकारने स्वखर्चाने जायकवाडी धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकावा,जायकवाडीचे पाणी वापरणाऱ्या उद्योग, नगरपालिकामध्ये जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरी मध्ये ५ टक्के राखीव जागा ठेवण्यात याव्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी प्रकाश वानोले, मुस्ताक पटेल , किशोर शिर्वत , मुकबुल पठाण ,नरलोग परळकर, संदीपान खरात ,शरद गुंते,नारायण बाबा वाघमोडे, कल्याण मगरे, रामनाथ बेडके, संकेत जाधव, शिवाजी तोमुरे, शाम भागवत , राधेश्याम कुसलकर, अजय पाखरे,रवी अडसूळ ,कडूबा जगधने,श्रीराम नरवडे,सोमनाथ शिंदे ,साईनाथ कर्डिले,अर्जुन खरात ,पांडुरंग बोंबले आदि उपस्थित होते.

…तर जलसमाधी घेऊ

जायकवाडी धरणात पश्चिम वाहिन्याचे पाणी आणल्याशिवाय छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे समांतर पाईप लाईनच्या मोटारी चालू होऊ देणार नाही. त्यासाठी आम्हाला रक्त सांडण्याची, आत्महत्या करण्याची आणि जलसमाधी घेण्याची वेळ आली तरी त्यासाठी आमची तयारी आहे, याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.

जयाजीराव सूर्यवंशी
अध्यक्ष,अन्नदाता शेतकरी संघटना

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!