माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तब्बल 12 आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला,
असा खळबळजनक दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, शिंदे गटाने हे वृत्त साफ धुडकावून लावले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी गतवर्षी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंडखोरी केली होती. कालांतराने शिंदेंच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्हही मिळाले.
पण आता शिंदे गटातील राजकीय केमेस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. यातूनच या गटातील जवळपास 12 आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे गत 27 जुलै रोजी शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा द्याव्यात,
असे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी मातोश्रीर फोनही केला. पण ठाकरेंनी त्यांना स्पष्टपणे भेट नाकारली.सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा दाखला देत या आमदारांना भेट नाकारली. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार तथा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, आमच्यापैकी एकानेही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील 10 आमदारांनी
एकनाथ शिंदेंना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यापैकी 6 आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. मी त्यांची नावे सांगू शकतो. पण राजकारणात नैतिकता पाळायची असते, असे ते म्हणाले.