नेवासा
तुमचे बंद क्रेडीट कार्ड चालु करु देतो असे म्हणुन बैंक खात्यावरून वेळोवेळी एकुण 45 हजार 30 रुपये फसवणुक करून काढुन घेतल्या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद हल्ली भेंडा येथे राहणाऱ्या वडचुना,ता.औदा, जि. हींगोली येथील विजय कैलासराव चिलगर (वय 39 वर्षे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की, मी भेंडा येथे राहण्यास असुन मी तेलकुडगाव, ता. नेवासा येथे आरोग्य सेवक म्हणुन नोकरीस आहे. त्यावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तसेच मी माझे वापरासाठी क्रेटकार्ड घेतले असुन ते मी वापरतो आहे.
दि. 03/08/2023 रोजी सकाळी 11:20 वाजेचे सुमारास तेलकुडगाव, ता. नेवासा येथे ड्युटीवर असताना मला माझ्या मोबाईल नं 9637377837 यावर मोबाईल नंबर 7602083242 या नंबर वरुन फोन आला व सदर इसम मला म्हणाला की, तुमचे एस.बी.आयचे क्रेडीट कार्ड बंद झाले आहे. तुम्हाला त्याचे नुतनीकरण करायचे आसेल तर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो सांगा. त्यावेळेस सदर इसम याने माझे क्रेडीट कार्डचा नंबर सांगीतला. त्यामुळे मला सदर इसम याच्यावर विश्वास बसला. त्यामुळे मी सदर इसम याला आलेला ओटीपी सांगीतला. तसेच मी त्यास सांगीतले होते की, माझे मागच्या महीन्यात देखील जास्त पैसे भरण्यात गेले होते असे सांगीतले असता त्या इसमाने मला सांगीतले की, तुम्हाला पुन्हा ओटीपी येईल तो तुम्ही मला सांगा असे त्याने सांगीतल्याने मी त्यास दोन-तीन वेळेस ओटीपी सांगीतला तसेच तो इसम मला म्हणाला की, तुम्हाला पुन्हा संध्याकाळी फोन येईल व तुमचे कार्ड पुन्हा चालु होईल असे त्याने मला सांगीतले. त्यानंतर मला त्याच मोबाईल नंबर वरुन त्याचा पुन्हा सायंकाळी 05 वाजेचे सुमारास फोन आला व त्याने मला एक लिंक पाठवली त्या लिंकवर त्यांनी मला क्लीक करण्यास सांगीतले असता मी त्यावर क्लीक केले असता माझ्या खात्यामधुन 9 हजार 637 रुपये 17:15 वाजता व 4 हजार 998 रुपये सुमारे 17:26 वाजता असे एकुण 14 हजार 635 रुपये कट झाले आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आले की सदर इसमाने नाझी फसवणुक केली आहे. त्यानंतर मी दि. 04/08/2023 रोजी सकाळी एस.बी.आय शाखा यांच्याकडे जावुन विचारपुस केली असता त्यांनी मला सांगीतले की, तुमच्या क्रेडीटकार्ड मधुन एका पाठोपाठ 10 हजार रुपये सुमारे 11:20 वाजता त्या नंतर लगेच 10 हजार रुपये सुमारे 11:21 वाजता तसेच लगेच 10 हजार 395 रुपये 11:23 वाजता मोबी क्वीक या अँप द्वारे कट झाले, असे माझे क्रेडीट कार्डवरुन एकुण 30 हजार 395 रुपये गेले असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच माझ्या क्रेडीट कार्डवरुन 30 हजार 395 रुपये व फोन पे वरुन 14 हजार 635 रुपये असे एकुण 45 हजार 30 रुपये फसवणुक करुन काढुन घेतले आहे.
या फिर्यादिवरुन फसवणूक करणारे अज्ञात इसमाविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.