माय महाराष्ट्र न्यूज:रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी श्रावण पौर्णिमा तिथी ३० आणि ३१ ऑगस्ट या दोन दिवशी येत आहे.
श्रावण पौर्णिमा तिथीवर भाद्रची छाया असेल. धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही. म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हटले जाते. भद्राकाळ
अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची छाया किती काळ राहील आणि राखी कधी बांधावी हे जाणून घेऊया.या वर्षी श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता
सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:07 वाजता समाप्त होईल. पौर्णिमा दोन दिवसांची असल्याने यावेळी रक्षाबंधनाचा सण देखील दोन दिवस साजरा केला जाणार आहे. मात्र, रक्षाबंधनावर भद्राची छाया देखील असणार आहे. यंदाच्या
रक्षाबंधनाच्या तारखेबाबत मतभेद आहेत. हिंदू पंचांगानुसार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजल्यापासून भद्रा काळ सुरू होईल आणि तो रात्री 09:01 पर्यंत राहील. त्यामुळे यंदा 30 ऑगस्ट रोजी सकाळी भद्रा सुरू होण्यापूर्वी
किंवा रात्री 9.03 वाजेनंतर राखी बांधता येईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:07 पूर्वी म्हणजे पौर्णिमा संपण्यापूर्वी राखी बांधता येईल.
काय असतो भद्रा काळ?
धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथानुसार, भद्रा ही शनिदेवाची बहीण, भगवान सूर्य आणि माता छाया यांचे अपत्य आहे. पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा
लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपलं भोजन बनवायला सुरुवात केली. त्यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगल कार्ये, यज्ञ व विधी सुरू होते तिथे भद्रामुळे त्रास होऊ लागला. यामुळे जेव्हा भद्रा काळ असतो तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
धार्मिक मान्यतेनुसार भद्रा स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी अशा तिन्ही लोकांमध्ये वास करते. जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत असतो, तेव्हा भद्रा पृथ्वीवर असते. जेव्हा भद्रा पृथ्वीलोकात असते त्याकाळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मंगल
कार्ये केले जात नाही. भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार भद्राकालातच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती, त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला.