माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचं आज आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागने दिला आहे.
पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या शेवटी राज्यात मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मागील दोन आठवडे राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडे सरकणारा मॉन्सूनचा आस आणि बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचे पुनरागमन होणार आहे.
भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात ढगाळ हवामान वाढेल, तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर,
गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध
भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल.