माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारने काही दिवसांपूर्वी इमर्जन्सी अलर्टची चाचणी करणारा संदेश सर्व अँड्रॉईड स्मार्टफोनवर पाठवला होता. आज दुपारी 12.49 च्या सुमारास असाच आणखी
एक संदेश कित्येक स्मार्टफोनवर पाहायला मिळाला. ही केवळ चाचणी असून, यावर कोणतीही प्रतिक्रिया अपेक्षित नसल्याचं या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे.काय म्हटलंय संदेशात?”केंद्र सरकारच्या
टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेला हा केवळ ‘सॅम्पल टेस्टिंग मेसेज’ आहे. कृपया याकडे दुर्लक्ष करा. याबाबत तुम्हाला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सध्या
एक पॅन-इंडिया इमर्जन्सी अलर्ट सिस्टिम लागू करत आहे. त्याची ही चाचणी आहे.” अशी माहिती या संदेशात देण्यात आली आहे.मराठीतही आला अलर्टइंग्रजीमध्ये अलर्ट मिळाल्यानंतर थोड्याच वेळाने मराठीमध्येही अशीच सूचना मिळाली.
यामध्येही सारखीच माहिती देण्यात आली होती. दुपारी 12.56 वाजता हा मराठीमधील संदेश मिळाला. गेल्या महिन्यात देखील अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती.
काय आहे ही सिस्टीम?इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम या प्रणालीच्या माध्यमातून देशातील जवळपास सर्व स्मार्टफोनवर एकाच वेळी धोक्याचा इशारा देणं शक्य होणार आहे. एखाद्या नैैसर्गिक आपत्तीवेळी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी एकाच वेळी
सर्व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी याचा वापर करण्यात येईल. सध्या याची केवळ चाचणी सुरू आहे.मोबाईलमध्ये बदला ही सेटिंगतुम्हाला जर हा अलर्ट मिळाला नसेल, किंवा भविष्यात अशा प्रकारचे अलर्ट मिळावेत यासाठी मोबाईलमध्ये
एक सेटिंग बदलण्याची गरज आहे. इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय शोधा.यामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करून ‘
Wireless Emergency Alerts’ हा पर्याय निवडा. याठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टॉगलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील.