माय महाराष्ट्र न्यूज:मोबाईच्या कव्हरमध्ये तुम्हाला नोट, तिकीट किंवा कागद ठेवण्याची सवय असेल तर महागात पडू शकते. एका रिपोर्टनुसार यामुळे मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची शक्यता असते.
मोबाईल ब्लास्ट होण्याची अनेक कारणं समोर आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे कव्हरमध्ये नोट ठेवणं हे देखील आहे. फोन गरम होण्यामागे कव्हरमध्ये असलेली नोट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
फोनचा वारंवार वापर केला की तो गरम होतो. फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेल्या पैशांमुळे थंड होण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे फोन ओवर हीट होतो आणि ब्लास्ट होण्याची शक्यता असते.
फोनचं कव्हर जर जाड असेल आणि त्यात पैसे ठेवले असतील तर वायरलेस चार्जिंगमध्येही अडचण येऊ शकते.
फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्याने नेटवर्क इश्यू येऊ शकतो. फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर करणं देखील ब्लास्टचं कारण ठरू शकते.
फोनचं नुकसान होऊ नये म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवले असतील तर ते काढून पर्समध्ये ठेवा.