माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर
आली आहे. कॅगने हे ताशेरे ओढले आहेत. कॅगच्या अहवालानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या देशात एक देश विरोधी आणि मोदी विरोधी संस्था आहे. तीचं नाव कॅग
आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कटाची बळी पडली आहे. या संस्थने गेल्या काही दिवसात एकदोन नव्हे तर सात घोटाळे उघड केले आहेत. त्यामुळे कॅगवर मोदींनी तात्काळ ईडीचा रेड मारली पाहिजे, असा टोला सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला आहे.
सात घोटाळ्याचा रिपोर्ट देण्याची कॅगची हिंमतच कशी झाली? अडीचशे कोटीचे 1800 कोटी कसे झाले? असा कोणता चमत्कार घडला? असा चिमटा काढतानाच कॅगने टोल प्लाझाचे ऑडिट केले.
त्यात 132 कोटी रुपयांची लूट करण्यात आल्याचं म्हटलं आहे, असा दावाही श्रीनेत यांनी केला आहे.एक रस्ता बनवण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी 18 कोटींची मंजुरी देण्यात आली. मात्र, नंतर कोणत्याही
मंजुरीशिवाय हाच रस्ता 251 कोटी खर्चून बनवला आहे. हा एवढा मोठा घोटाळा आहे, असा दावा आपच्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी केला आहे.