Saturday, September 23, 2023

ब्रेकिंग: मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे मोठे निर्णय….

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात 1976 पासून कॅसिनो कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेकदा कॅसिनो सुरू करण्याची मागणी केली जात होती. या मागणीसाठी अनेक जण कोर्टात देखील गेलेले आहेत.

मात्र, नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात देखील हे विधेयक रद्द करण्याची घोषणा केली होती.

राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने कृषी तसेच

महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे तसेच चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

गौरी गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा सरकारकडून वाटप केला जाणार आहे.

राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवली जाणार आहे. या योजनेसाठी पाच हजार कोटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

कौशल्य विकास विभागाने आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्याचा निर्णय़ घेतला आहे. आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत..मुंबईच्या फोर्ट येथे असलेल्या प्रेस क्लबच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून घेण्यात आला आहे.सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे

दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन रत्नागिरीतील मंडणगड तालुका येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याचा निर्णय

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!