माय महाराष्ट्र न्यूज:श्रावण शुक्ल पक्षात पहिल्या सोमवारचे व्रत 21 ऑगस्टला केले जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी नागपंचमी आहे. तसेच अनेक शुभ योग जुळून येत आहे.
या दिवशी शिव शंकराची विधिवत पूजा केल्याने भविकांना दुप्पट लाभ मिळतो, असे मानले जाते.पहिल्या श्रावण सोमवारी चंद्र, तूळ राशीत राहील. गजकेसरी योगात चंद्र आणि गुरु एकमेकांच्या समोर येतील.
याशिवाय पहाटे 4 वाजून 22 मिनिटांला सर्वार्थ सिद्धि योग राहील. अशात अमृत योगही जुळून येतोय. या शुभ योगासोबत रवी योग राहाणार आहे.21 ऑगस्टला नागपंचमी आहे. कालसर्प दोष आणि पितृदोष निवारण
करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तसेच या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकतात. सोबतच शिवशंकराचा रुद्राभिषेक करणेही फायदेशीर मानले जाते.श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात नागपंचमीचे व्रत आहे. पंचमी
21 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटे ते 22 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत राहिल.मान्यतेनुसार, नागपंचमीला नागपूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नागपंचमीला
नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. सोबतच सर्व इच्छा पूर्ण होतात.कालसर्प दोष दूर करण्यासाठी पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराला कच्चे दूध, काळे तीळ आणि गंगाजल अर्पण करावे.
हा उपाय केल्याने कालसर्प दोष दूर होईल. जीवनातील सर्व समस्या दूर होतात.