माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क च्या एकूण 12 संवर्गातील रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू होत आहे. 12 संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने
भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जाणून घ्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आणि वेतनश्रेणी किती असणार आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत रिक्त एकूण 12 पदांसाठी भरती
प्रक्रिया होत आहे. यामध्ये प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक
सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक / टंकलेखक या पदांचा समावेश आहे.ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात – 5 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 26 ऑक्टोबर
2023 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत – 26 ऑक्टोबर 2023 हॉटतिकिट डाऊनलोड करण्याचा दिनांक – परीक्षेच्या 7 दिवस आधी.अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज सादर करण्याची पद्धत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा
सविस्तर तपशील इत्यादी बाबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या वेबसाईटवर प्रसारित करण्यात येईल. तसेच भरावयाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता,
शैक्षणिक अर्हता, सामाजिक आणि समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज दाखल करण्याच्या मार्गदर्शक
सूचना इत्यादीच्या संदर्भातील सविस्तर सूचना मंडळाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे प्रसारित करण्यात येतील.