माय महाराष्ट्र न्यूज: यंदा 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी होणार आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे नागपंचमीलाच सोमवारदेखील आहे. त्यामुळे आधीच महत्त्वाच्या असलेल्या या सणाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
नाग हा भगवान महादेवांचा सर्वात प्रिय दागिना मानला जातो. त्यामुळे नागाच्या पूजेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील पुजारी शुभम तिवारी सांगतात,
नागपंचमीला नागाची पूजा करणाऱ्यांना नाग चावण्याची भीती नसते. जरी नाग चावला तरी व्यक्तीला मृत्यूनंतर मुक्ती मिळते, असं मानलं जातं. राहू-केतू दोषांपासून मुक्ती मिळावी यासाठी या दिवशी अनंत, तक्षक आणि पिंगल नागाची पूजा करतात.
त्याचबरोबर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हा विधी सर्वक्षेष्ठ मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, काही असे कार्य आहेत, जे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नये. अन्यथा
त्याचा दोष आपल्या येणाऱ्या सात पिढ्यांना लागतो आणि आपल्या चुकीमुळे ते संकटात आयुष्य जगतात.पुजारी शुभम म्हणतात, नागपंचमीला नागदेवतेची केवळ पूजा करावी, नागाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये.
जिवंत सापाला दूध देऊ नये, केवळ सापाच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर दूध अर्पण करावं. तसंच या दिवशी जमिनीचं खोदकाम करू नये. अनेकदा खोदकामात साप नष्ट होतात. त्यामुळे त्यांना त्रास होईल, असं कोणतंही कार्य या दिवशी करू नये.
नागपंचमीला नागदेवतेजवळ प्रार्थना करावी. त्यांच्या प्रतिमेला दूध, फळं, फूलं अर्पण करावी. या दिवशी स्वच्छ मनाने नागदेवताची पूजा केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते, शिवाय मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.