भेंडा: ब्रह्मलीन योगीराज प्रल्हादगिरी महाराज तसेच ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत भास्करगिरी महाराज प्रेरणेने व महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली
नेवासा तालुक्यातील श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर येथे सोमवारी बारा ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठान सोहळा व महापूजा आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती महंत सुनीलगिरी महाराज यांनी दिली आहे.
श्रावणी पहिला सोमवार येत असल्याने सकाळी दहा ते बारा हरिभक्त पारायण अमोल महाराज घाडगे तेलकुडगाव यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे . पहिल्या श्रावणी
सोमवार निमित्त शिवम महिंद्र कानडे सवेरा मोटर्स नेवासा फाटा यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे.तरी या प्राणप्रतिष्ठान सोहळा व महापूजा साठी परिसरातील भाविक भक्तांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महंत सुनीलगिरी महाराज यांनी केली आहे.