नेवासा
नेवासा तालुक्यातील गळनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यानतंर सरपंच सौ.कुसुम बाळासाहेब
खर्जुले यांनी आपल्या पती सह रक्तदान करून ग्रामपंचायत पदभार स्वीकारला.
गळनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले यांच्या पत्नी सौ.कुसुम खर्जुले यांची बिनविरोध निवड झाली. परंतु कुठलीही पूजा पाठ न करता नेवासा गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे गळनिंब ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत स्वतः सरपंच व पती बाळासाहेब या दोघा पती-पत्नींनी रक्तदान केले.
याप्रसंगी बोलताना सरपंच सौ.
खर्जुले म्हणाल्या की, माझे पती आ. बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने राजकारण करतात बच्चुभाऊ म्हणजे रुग्णसेवा करणारे आणि स्वतः रक्तदान करणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. महिला रक्तदान करू शकतात हा संदेश देण्यासाठी मी आज हा निर्णय घेतला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले यावेळी म्हणाले की सामान्य व्यक्तीच्या घरात सरपंच पद दिल्याने जनसामान्य व्यक्तीच्या दारापर्यंत सर्व ग्रामपंचायत योजना नेणार आहोत यामध्ये पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन गळनिंब येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब उर्फ पिंटू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू.
नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी गावातील विविध कामांना भेटी देऊन सांगितले की सर्व चालू असलेली कामे समाधानकारक आहेत. पंचायत समिती मार्फत गाव आदर्श होण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळीवरील मदत करू. महिला सरपंच सौ.कुसुम खर्जुले यांनी जे रक्तदान केले ते म्हणजे आपल्या नेवासा तालुक्यासाठी आदर्श उदाहरण आहे.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे म्हणाले की नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी सरपंच पत्नी व पतीने रक्तदान केले आहे नेवासा तालुक्यातील नाहीतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी या उपक्रमाचा आदर्श घ्यावा ग्रामविकास खात्याकडून नामदार बच्चुभाऊ यांच्या माध्यमातून गळणीम गावाच्या विकासासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून देवू जी काही गरज लागेल त्या गरजेच्या वेळी संपूर्ण प्रहार टीम उभा राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रहारचे जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट पांडुरंग औताडे यांनी केले. कार्यक्रमाला रक्तदानासाठी अहमदनगर येथील अर्पण ब्लड बँकेचे सर्व स्टाफ यांनी रक्तदानासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पिंटू शेठ शेळके, माझी जिल्हा परिषद सदस्य रत्नाबाई बोरुडे, राजेंद्र घावटे, अभिजीत वाडेकर, अमोल बनसोडे, विकास शेळके, नानाभाऊ शेळके, कडूबाळ खर्जुले, सतीश खर्जुले अशा २१ ग्रामस्थांनी रक्तदान केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती शेळके, रामदास शेळके, मनीषा हिवाळे, विजय घावटे, विष्णू शेळके, वैशाली शेळके, मनोज हिवाळे, चंदू पन्हाळे, सोमा शेळके व ग्रामसेवक गणेश गायकवाड आरोग्य विभागाचे डॉ.चेतना कानडे, डॉ.शिवाजीराव वजूके गावातील नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.