नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळप केलेल्या 11 लाख 77 हजार 100 मॅट्रिक टन उस बिलाची 127.85 रुपये प्रति टन प्रमाणे होणारी 15 कोटी 5 लाख रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती आज गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी वर्ग करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली
अधिक माहिती देताना श्री. घुले पुढे म्हणाले की,लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2022- 23 मध्ये 11 लाख 77 हजार 100 मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. अंतिम साखर उतारा 11.11 टक्के मिळाल्याने एफआरपीनुसार प्रति मेट्रिक टन 2527.85 रुपये भाव निघाला. यापूर्वी 2400 रुपये प्रति मेट्रिक टना प्रमाणे होणारी रक्कम या पूर्वीच बँकेत वर्ग करण्यात आलेली आहे. उर्वरित 127.85 रुपये प्रति मेट्रिक टन होणारी
रक्कम 15 कोटी 5 लाख रुपये
संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाते आज गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी बँक खाती वर्ग करण्यात येत आहे.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ठेवलेल्या ठेवीवर होणारे व्याज प्रतिवर्षा प्रमाणे दिपावली सणा पूर्वी वर्ग करण्यात येणार आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेब यांच्या विचारांची परंपरा कायम ठेवत बैल पोळा सनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट देण्याची परंपरा कारखाना व्यवस्थापनाने जोपासल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.