महाराष्ट्र:बिआरएस पार्टीतील ‘सोशल मिडिया ‘ विभागातील सर्वात दमदार कामगिरी करणाऱ्या चेहऱ्यापैकी मुंबईतील रविंद्र रोकडे, नाशिक येथील प्रकाश चव्हाण आणि बीड जिल्ह्यातील योगेश साखरे या तिन्ही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय
सोशल मिडियाला पूर्णत्व प्राप्त होत नाही असे जणू काही समीकरण बिआरएस पार्टीत तयार झाले आहे.बिआरएस पार्टी महाराष्ट्रात येणार असल्याची चाहूल लागताच जानेवारी २०२३ पासून सोशल मिडियाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा या तिघांनी सांभाळली.
महाराष्ट्रभर मिडियाद्वारे प्रचार करीत असताना कोणत्याही प्रलोभनलास बळी न पडता ऊन, पाऊस, वारा, थंडी याची तमा न बाळगता सोशल मिडियाचे काम अखंडपणे सुरू ठेवले. याच दरम्यान या तिघांची एकमेकांशी ओळख झाली. बिआरएस पार्टीतील धोरणे, तेलंगाणा मॉडेलचा प्रचार प्रसार करीत
तिघांनी अवघ्या ७ महिन्यात बिआरएस चा सोशल मिडिया महाराष्ट्रातील घरोघरी पोहविण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत राहिले. हळू हळू नांदेड येथील संतोष घोडके, छत्रपती संभाजी नगर येथून जनार्दन साबळे,नागपूर येथून प्रशांत तागडे, अहमदनगर येथून राहुल कोळसे
अशी बिआरएस मिडियासाठी प्रभावशालीरित्या काम करणारी इतर मंडळी या प्रसार कार्यात सहभागी झाली. कार्याची दखल सुरुवातीला कोणीच घेत नव्हते, हळू हळू जसे महाराष्ट्रात बिआरएस पार्टीचा लोकांचा वाढता प्रतिसाद आणि शेतकऱ्यांना
बिआरएस पार्टीची पडलेली भुरळ पाहता बिआरएस पार्टीचा प्रचार सुरू होता. हळू हळू पक्षातील प्रमुख नेते, माजी आमदार, खासदार, तसेच सर्व विभागीय समन्वयक हे कामाची दखल घेऊ लागले. तसेच प्रौत्साहन देऊ लागले. त्यांच्याद्वारा केलेल्या कामाची
प्रशंसा सुद्धा हळू हळू होऊ लागली.सद्य स्थितीतील मिडिया फक्त तीन महिन्यात जलद गतीने वेगवान कसा पळू शकतो याचे अभ्यासपूर्वक, शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले. याच संकल्पनेची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करण्यात आली. यातूनच ‘बिआरएस
मिडिया महा-मिशन’ ही संकल्पना उदयास आली.बिआरएस पार्टीला महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी कोणत्या बाबीची गरज आहे ? नेमकी गाडी अडकते कुठे ? चुकीच्या धोरणातून योग्य धोरणात घेतलेली झेप म्हणजेच महाराष्ट्रातील बिआरएस मिडियाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम म्हणणेच ‘बिआरएस मिडिया महा-मिशन’ होय .
सोशल मिडीयाचा संपूर्ण सेटअप अतिशय स्मार्ट आणि जलद पद्धतीने तयार करण्यात आला. उपलब्ध अशा कागदोपत्री आणि माहितीच्या संकलनाच्या आधारावर योग्य अशी पदे नियुक्तीची रचना करण्यात आली. सर्व मिडिया माध्यमांना गतिशिल चालना
मिळेल अशी रणनीती साधी, सोपी आणि जलद अशी आखण्यात आली. मैत्रीपूर्ण संबंध इतर सोशल मिडियातील संघासोबत दृढ कसे होईल ? या सर्व बाबीचा विचार करता ‘बिआरएस मिडिया महा-मिशन’ या संकल्पनेचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्यात या संकल्पनेचा
आधार घेतल्यास, बिआरएस पार्टीला प्रचंड मदत होईल हे नक्कीच ! महाराष्ट्रात हा ‘बिआरएस मिडिया महा-मिशन’ ही संकल्पना अर्थात हा फॉर्म्युला इतर पक्षाच्या सोशल मिडीयाच्या तुलनेत अधिक पॉवरफुल्ल ठरेल हे नक्कीच !