माय महाराष्ट्र न्यूज:भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. आणि अशा कृषिप्रधान देशातच शेतकरी अतिशय दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र आहे. ज्या देशात महत्वाचा घटक असलेला शेतकरीच जर एवढा मरण यातना
सोसत असेल तर, त्या देशाची भविष्यातील वाटचाल किती संघर्षमय आणि बिकट असेल याची आपल्याला कल्पना येते. प्रत्येक संकट जर प्रथम बळीराजा समोर उभे ठाकत असेल तर, या देशाला आपण कृषिप्रधान देश कसे काय म्हणू शकतो.?
असा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक दशके उलटली. तरीही या देशात शेतकरी अजूनही दारिद्र्या खालीच जीवन जगत आहे. हे खूपच दुर्दैवी म्हणावे लागेल. कृषिप्रधान देश म्हणजे नेमके काय याची व्याख्या
आजपर्यंत कुणालाच कशी कळली नसेल याची एक शेतकरी पुत्र म्हणून खंत वाटते.प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. हे का आणि कशामुळे होते याचा देखील आजपर्यंत कुणीही विचार का केला नसेल याचे देखील आश्चर्य वाटते. फक्त निवडणुका
आल्या की इथल्या शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देऊन सपशेल गंडवले जाते. माझा बळीराजा खूप साधा आणि भोळा आहे. पटकन तो कोणावरही विश्वास ठेवतो. आणि तिथेच त्याची फसवणूक केली जाते.त्याच्याही घरात अनेक समस्या असतात हे कुणालाच
कसे कळत नसेल.? यदाकदाचित त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळायला लागला की, येथील खोटारडी राज्य व्यवस्था फळे भाज्या आणि शेतीमाल आयात करण्याचा घाट घालते. आणि क्षणात त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले जाते. हे राजरोसपणे केले जाते. तरीही माझा
बळीराजा गपगुमाने सहन करत असतो. परंतू हे आपण किती दिवस सहन करणार आहोत, यावर देखील चिंतन करावे लागेल. त्याला बळीराजा हे गोंडस नाव देऊन राज्यकर्त्यांनी आजपर्यंत त्याचा घातच घेतला आहे. परंतू आता काळ बदलणार आहे. 2014 साली
आंध्रप्रदेशाची विभागनी होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, आणि तेथील शेतकरी बांधवांसाठी सोनेरी पहाट उगवली.हे आता कोणीही नाकारू शकत नाही. तिथला शेतकरी सुखी झाला. अनेक योजनांच्या माध्यमातून भरीव मदत मिळु लागली.वदेशात खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
केसीआर साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढणारा आणि झगडनारा देवदूतच भेटला आहे. आता ही क्रांती तेलंगणा राज्यापुरतीच मर्यादित न ठेवता देशभरात प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या सर्व तरुण मंडळींवर येऊन ठेपली आहे. आपल्या
शेतकरी बापासाठी ही जबाबदारी आपण आता पेलली पाहिजे. देशात अनेक नेते होऊन गेले. परंतू शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने काळ्जी घेणारा नेता म्हणून केसीआर साहेबांची ओळख देशभरात निर्माण झाली आहे.महाराष्ट्रसह देशात शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी
आता एकजूट होऊन काम करुया, आदरणीय साहेबांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांचे सरकार राज्यात आणि देशात आणण्यासाठी येथील युवा एकत्र येईल असा विश्वास आहे.
*… ✍️ श्री योगेश जी साखरे*
9673731285
*BrsSocialMediaMaharashtra*