माय महाराष्ट्र न्यूज:हवामानाचा अचूक अंदाज यावा, यासाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज येण्यास मदत होणार आहे. सध्या नगर जिल्ह्यात ९७ महसूल मंडळात हवामान केंद्र असून आणखी ४६९ गावात हे केंद्र प्रस्तावित आहेत.हवामान केंद्रामुळे काेणत्या गावात पाऊस पडेल, याचा अंदाज
सांगणे शक्य हाेणार आहे. गावपातळीवर वादळ, वारे आणि नैसर्गिक आपत्तीची स्थिती काय असेल, याचा अंदाज सांगता येईल. ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यावेळी विमा कंपन्या स्कायमेटकडूनच सर्व माहिती घेतात. आता ही व्यवस्था
मंडळाच्या ठिकाणीच राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा हवामान केंद्राची उभारणी झाली, तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे.