नेवासा/भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबांची आज सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी यात्रा आहे.
दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते.यात्रे निमित्त दि.२९ ऑगस्ट पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यात्रेच्या दिवशी संत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते.दुपारी नागेबाबांचे समधीस जलाभिषेक करण्यात येऊन दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते.सायंकाळी उपस्थित भाविकांना आमटी-भाकरीचा प्रसाद हे यात्रेचे आणि गावात एक ही आंब्याचे झाड नाही हे या गावचे वैशिष्टय आहे.गावातील बाहेर गावी नोकरीस असलेली माणसं, लग्न होऊन गेलेल्या सासरी गेलेल्या मुली यात्रेसाठी आर्वजून उपस्थित राहतात.
मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सांगता होणार आहे