नेवासा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवली सराटी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज नेवासा तालुका सकल मराठा समाजाकडून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याबाबद सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. यासाठी राज्यभरात सर्वच जिल्ह्यात मराठा क्रांती मुक मोर्चे काढण्यात आले, अमरण उपोषना सारखे आंदोलन करण्यात आले.परंतु सरकारच्या बोटचेपी भूमिकेमुळे आजही मराठा समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे व आपला लढा देत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा बांधवांकडून शांततेच्या, सनदशीर मार्गाने आंदोलन करत असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यामधे अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले यामधे महिला आंदोलक, लहान मुले देखिल गंभीर जखमी झाले. अनेक आंदोलकाना जालना येथील हॉस्पिटल मधे हलविण्यात आले. याचे राज्यभर पडसाद उमटले. व राज्यभरात लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचा व सरकारचा रस्त्यावर उतरुन निषेध करण्यात आला. नेवासा तालुक्यात देखिल या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आज नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर दीड तास रस्ता रोको आंदोलन करून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावे, जखमींना तातडीने आर्थिक मदत जाहिर करावी,राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, सदर घटनेची सीबीआई कडून चौकशी करण्यात यावी, मराठा समाजास आरक्षण कधी देणार,सरकार यासाठी कोणती ठोस भूमिका घेणार हे स्पष्ट करावे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी नेवासा पोलीस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात राजेंद्र वाघमारे ,संभाजी माळवदे, काशिनाथ नवले, पीआर जाधव, गणेश निमसे, बाबा अरगडे,वकील संघाचे बन्सी सातपुते, कल्याणराव पिसाळ, गणेश चौगुले, रावसाहेब घुमरे, सरपंच दादा निपुंगे, संदीप अलवणे, अनिल टाके, दादासाहेब गंडाळ, सचिन नागपुरे, सूरज नांगरे , गणेश झगरे आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सोमनाथ गायकवाड, संदीप मोटे,नितीन अडसुरे, महेश नीपुंगे, अभिजित नुपुंगे, मुन्ना चक्रनारायान, नारायण लष्करे, भास्कर लिहिणार, गोरक्षनाथ काळे, संजय लीपाणे , विष्णू उंदरे आदीसह नेवासा तालुक्यातील सर्वच गावातून आलेले नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.