Thursday, October 5, 2023

उद्धव ठाकरे शुक्रवारी नगर जिल्हा दौर्‍यावर….

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. 8) नगर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोपरगाव, संगमनेर, राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांशी ते संवाद साधणार आहेत.दौर्‍याचा अधिकृत तपशील प्राप्त झाला नसला तरी पक्षाच्या सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला. शिर्डी मतदारसंघाचे

खासदार सदाशिव लोखंडे ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला.

माजी मंत्री बबनराव घोलप हेही शिर्डीतून लोकसभेसाठी इच्छुक आहेत.उद्धव ठाकरे हे दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात येत असून हा एकदिवसीय दुष्काळी दौरा असणार आहे. यात ते सकाळी

8 सप्टेंबर रोजी सकाळी शिर्डी विमानतळावर उतरतील. त्यानंतर राहता तालुक्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव या ठिकाणी पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यात कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी उद्धव ठाकरे जातील. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतील, अशी माहिती आहे.

त्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यासोबतच ठाकरे गटाचे काही नेते सुद्धा सोबत असणार आहेत. नगर जिल्ह्यातील जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे, जिथे

 

अद्यापही पाऊस नाही, शेतकरी अडचणीत आहेत, अशा शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!