माय महाराष्ट्र न्यूज:अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज गुड न्यूज मिळू शकते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळणार मिळू शकतो.
राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत बटन दाबून वितरित केला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यावर 350 रुपये समुग्रह
अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहेत. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज
केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीला आला त्यावेळी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात कांद्याचे दर खूपच कमी झाले होते. त्यामुळे
शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. त्यावेळ शिंदे-फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.नाशिक, धाराशिव, पुणे, सोलापर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे,
जळगाव, बीड व कोल्हापूर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान मिळणार आहे. उर्वरित 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्कम कमी असल्याने त्यांना एकाच टप्प्यात अनुदान मिळेल, असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं.