Thursday, October 5, 2023

ब्रेकिंग: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (6 सप्टेंबर 2023) पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घ्या या निर्णयाच्या संदर्भात अधिक माहिती.

बुधवार 06 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

1. मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत (नगरविकास विभाग)2. मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव (पर्यटन विभाग)3. राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प (गृह विभाग)

4. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज (सहकार विभाग)5. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट (महसूल विभाग)

6. मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात (महसूल विभाग)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत-जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे

अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!