Thursday, October 5, 2023

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीच्या काळात भाव घसरला

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: सोनं-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात आजही सोनं आण चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण दिसून येत आहे.

आज 24 कॅरेट सोने 59125 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुले झाले. 23 कॅरेट सोने 58888 रुपये प्रती 10 ग्रॅमव खुले झाले.याशिवाय, 22 कॅरेट सोन्याचा भाव 54159 रुपये ग्रम आहे. तर 18 कॅरेट सोने

44344 रुपयांवर आहे. याच बरोबर चांदीही 71180 रुपये किलोवर खुली झाली. महत्वाचे म्हणजे, या दर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जसचा समावेश करण्यात आलेला नाही.

आयबीजेएवरील ताज्या खुल्या किंमतीनुसार, आज 24 कैरेट सोने बुधवारच्या 59329 रुपये या बंद भावाच्या तुलनेत 204 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह खुले झाले. तर, एक किलो चांदीचा भाव 885 रुपयांनी स्वस्त होऊन 71180 रुपयांवर आला आहे.

सणासुदीच्या दिवसांत काय असेल सोन्या-चांदीची स्थिती – यासंदर्भात बोलताना कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह म्हणाले, आगामी सनासुदीचा सिझन पाहता, सोन्याची मागणी वाढलेली दिसत आहे. अमेरिकेत आर्थिक आव्हानांमुळे सोन्याच्या

किंमती स्थिर आहेत. असे असतानाही सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. हा आशावाद शेअर बाजाराच्या मजबूत कामगिरीमुळे आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा काळ पारंपारिक दृष्ट्या शुभ मानला जातो. हा सन आणि लग्नाचा काळ

असतो, यामुळे सोन्याची मागणी वाडते.24 कॅरेट सोनं असंत सर्वात शुद्ध – खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो.

सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट – जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच

सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!