Saturday, September 23, 2023

UPI वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आता …

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला सांगून यूपीआय पेमेंटच करू शकणार आहात. तुम्हाला रेस्टॉरंटचे बिल भरायचे असेल, एखाद्याला पैसे पाठवायचे असतील किंवा

युटिलिटी बिल सेटल करायचे असेल फक्त Hello UPI म्हणा आणि कुठे किती पेमेंट करायचे ते स्मार्टफोनला सागून पेमेंट पूर्ण करा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बुधवारी लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर नवीन पेमेंट फीचर लॉन्च केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NPCI) उत्पादने लॉन्च केली. यादरम्यान ‘हॅलो यूपीआय’ नावाचे प्रोडक्ट देखील लॉन्च करण्यात आले आहे.

यामध्ये अॅप, फोन कॉल आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उपकरणांद्वारे हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हाइस कमांडद्वारे म्हणजे आवाजाद्वारे तुम्हाला UPI पेमेंट करता येणार आहे.व्हाइस कमांड या फिचरमुळे देशातील डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना

आणखी एक सोपा आणि जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात क्रेडिट लाइन ऑन यूपीआय, UPI LITE X आणि टॅप अँड पे, हॅलो!

UPI – Conversational Payments on UPI, BillPay कनेक्ट, Conversational Bill Payments या फीचर्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे NPCI ने ऑफलाइन पेमेंट सुविधा सक्षम करण्यासाठी गेल्या वर्षी UPI लाइट लाँच केले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!