Thursday, October 5, 2023

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजपासून करा अर्ज…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचना जारी करण्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज करण्यासंबंधी तारखा देखील जाहीर केल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासून म्हणजे 7 सप्टेंबर 2023 पासून SBI PO भरतीसाठी ऑनलाइन

अर्ज करू शकतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने एकूण 2000 हजार रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. भरतीसाठी एकूण पदे…

जनरल : 810 पदे

ओबीसी : 540 पदे

ईडब्ल्यूएस : 240 पदे

एससी : 300 पदे

एसटी : 150 पदे

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहेत ते देखील अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 1 एप्रिल 2023 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल. नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना पहिल्यांदा पूर्व परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. मुख्य परीक्षेत निर्धारित कटऑफ गुण

प्राप्त करणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. दरम्यान, अधिक माहितीसाठी, उमेदवार बँकेची अधिसूचना पाहू शकतात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!