माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावी. कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात
विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीय. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.मनोज जरांगे यांच्या मागणीचा
विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कालच याबाबत घोषणा केली होती. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं.
त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत जीआर काढलाय. सरकारने मनोज जरांगे यांना पत्र पाठवलंय. या पत्रात सरकारने जीआरबाबत माहिती देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन
करुन कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी जीआरची प्रत घेऊन अर्जुन खोतकर जालन्याकडे रवाना झाले आहेत. सरसकट आरक्षण देण्याची मागणी
करणारे जरांगे पाटील, काय निर्णय घेतात, हे कळेलच.राज्य शासनाने काढलेल्या ‘जीआर’मध्ये समितीची घोषणा केली असून समितीने निजामकालीन पुरावे तपासून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असं म्हटलंय.
जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली होती, शासनाने तसा निर्णय घेतला नसल्याने जरांगे पाटील काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.