माय महाराष्ट्र न्यूज:महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार इतके वर्ष सत्तेत राहिले, जाणता राजा म्हणून फिरले.
मात्र आरक्षणासाठी कधी प्रयत्न केलेले ऐकिवात नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं? याची श्वेतपत्रिका राज्य सरकार काढणार आहे. त्यावेळेस
मराठा बांधवांना खरं कळेल. आता तुम्ही जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन भाषणे देता. तुमच्या काळात तुम्ही मराठा बांधवांचे एवढे नुकसान केले आहे की, तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा घणाघात विखे पाटलांनी केला.
कर्तृत्व शून्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार होते. त्यांची लक्तरे आता वेशीवर टांगली जातील. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही समाज बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना काय
प्रयत्न केले? केंद्रात मंत्री असताना काय प्रयत्न केले? महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न केले? हे लोकांना कळू द्या”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.कुणबी मराठा आरक्षणा संदर्भात कालच मुख्यमंत्र्यांनी
धोरण स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील सर्व गावं ही निजाम संस्थामध्ये होती. त्यासाठी महसूल सचिवांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली आहे. ज्यांच्याकडे कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे
पाटलांची मुख्य हीच मागणी होती. आमची ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका आहे. जरांगे पाटलांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटलांना विनंती आहे, त्यांनी जास्त विषय ताणू नये”, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.