नेवासा
शेवगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील यांनी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठ्या गावात आज गणेश उत्सव सोहळा, विसर्जन ठिकाण व विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
त्यांनी शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्थितीची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. डिवायएसपी सुनिल पाटील,सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शनिशिंगणापुरचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकास भेट दिली. मंडळाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांनी त्यांचे स्वागत करुन गावात गणेश उत्सव सोहळा शांततेत व जातीय सलोखा जपून केला जात असल्याचे सांगितले.
अन्यथा कठोर कारवाई…
सर्व गणेश मंडळानी नोंदणी करुन उत्सवाचे पावित्र्य तसेच कायदा व सुव्यवस्था जपावी. सोशल मिडीयावर कुठलीही अफवा अथवा कुणाच्या भावना दुखतील असे कृत्य करु नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
-सुनिल पाटील
पोलीस उपअधीक्षक