माय महाराष्ट्र न्यूज:मुरबाड मतदार संघाचे अभ्यासू व कृतिशील माजी आमदार दिगंबरजी विशे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी
दि.७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हृदयविकाराने निधन झाले आहे.त्यांचे मूळ गाव मु. तळवळी, ता. मुरबाड ,जिल्हा ठाणे. ते स्वतः एक पेशाने शिक्षक होते.विशे यांचा जन्म जन्म ११ फेब्रुवारी १९५२ पुढे
राजकीय जीवन भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झाले. सन १९ ९५ मध्ये मुरबाड विधानसभा आमदार म्हणून निवडून आले होते. जवळजवळ 40 वर्ष मुरबाड तालुका अध्यक्ष पासून ते महाराष्ट्र राज्य पर्यंत भाजप सारख्या पक्षांमध्ये कार्य केले आहे.
सरते शेवटी स्वतःच्या कार्याची जाणीव झाल्याने त्यांनी सर्वसामान्य शोषित वंचित पीडित समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने त्यांनी तेलंगणा राज्याचे के चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व स्वीकारले.विशे हे माजी आमदार संघटनेचे सचिव, महाराष्ट्र राज्य आदिवासी
आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष, विनाअनुदानित कृषी तंत्र संघटनेचे सल्लागार, वसुंधरा संजीवनी मंडळ संघटनेचे सल्लागार, मृण्मयी शिक्षक प्रबोधनी संस्थेचे चेअरमन होते.बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी
बीआरएस पक्षाचे मुंबई कोकण विभागाचे सहसंयोजक, माजी आमदार दिगंबर नारायण विशे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिगंबर विशे यांच्या आत्म्याला शांती मिळावी
यासाठी प्रार्थना केली. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.