माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे अहमदनगर:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून
सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही उपोषण मागे घेण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. परंतु, मनोज जरांगे यांच्यावतीने एका शिष्टमंडळाने मुंबईत राज्य सरकारशी चर्चा
केल्यानंतर उपोषणासंदर्भात तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्याशी राज्य सरकारच्यावतीने चर्चा करण्यात माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. दरम्यान मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी भारत राष्ट्र समिती पुढे आली आहे .तेलंगणा राज्याचे
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. आणि ते लवकरच मनोज जरांगे यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा १२ वा
दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. ते सध्या फक्त पाणी आणि सलाईनच्या आधारे दिवस कंठत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला होता. मनोज
जरांगे यांनी शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांची आई आणि कुटुंबीय उपस्थित होते. ‘राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नसेल तर आज, शनिवारपासून पाणीही पिणार नाही आणि सलाइन
लावून घेणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. संवाद साधत असताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते.