नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे ९३ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कारखाना कार्यस्थळावर गायनाचार्य रामेश्वर महाराज देशमुख यांचा हरीभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे व सर्व संचालक मंडळाचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे यांनी केले आहे.