Thursday, October 5, 2023

बैलपोळा सणावर लम्पीचे सावट;गोजातीय जनावरे एकत्र आणाण्यावर निर्बंध

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

लंम्पी स्फीन डिसीज रोग प्रादुर्भावा बाबत अहमदनगर जिल्हा बाधित क्षेत्र व सतर्कता क्षेत्र घोषीत केल्याने आज होणाऱ्या बैलपोळा सणावर लम्पी आजाराचे सावट जाणवत आहे.

एका राज्यातून दुस-या राज्यात, एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात लम्पि बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरा पासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. लम्पि रोग हा विषाणूजण्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून
जिल्हाधिकारी सिद्धाराम मालीमठ
यांनी २१ ऑगस्ट २०२३ रोजी
अहमदनगर जिल्ह्यात प्रतीबंधात्मक उपाय योजना राबविणे बाबदच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. तसेच लम्पि रोगाचा संसर्ग वाढू नये या करिता गोजातीय जनावरे एकत्र आणण्यास प्रतिबंध केलेला आहे.या करिता लम्पी चर्म रोगाचा प्रतिबंध नियंत्रण निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे.

या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण प्रनिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि मीग्रस्त गोजातीय प्रजातीची सर्व गुरे म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले-ठेवले जातात त्या ठिकाणा पासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्र बाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर नेवासा पंचायत समिती पशु संवर्धन विभागाने
लम्फी रोगाने बाधित जनावरे असलेल्या गाव व त्याचे २० कि.मि. परिसरातील गावात जनावराचे बाजार शर्यती, जत्रा प्रदर्शन किंवा जनावरे एकत्रित करण्यास मनाई असल्याचे आदेश जारी केले आहेत.
नेवासा तालुक्यामधील ७८ गावामध्ये गोवर्ग जनावरामध्ये लम्पि सप्तर्गजन्य त्वचा रोग पसरलेला आहे. हा आजार माशा गोचीड गोमाशा व डासांमुळे पसरला जातो अद्याप पावेतो नेवासा तालुक्यात ७६ गावांमध्ये या रोगाने बाधित ४४० जनावरे आढळून आलेले आहेत.तालुक्यातील जनावरामध्ये लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा सुरु झाला असून त्यामुळे जिल्हाधिकारी अनगर यांचे आदेशाने संपूर्ण अनगर जिल्हा बाधित व सतर्कता क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे करिता तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये यावर्षीचा पोळा सन जनावरे एकत्रित करून साजरा करता येणार नाही करिता त्यादृष्टीने पोलीस स्टेशन अंतर्गत गावामध्ये पोळ्या निमित्त कोणत्याही प्रकारे जनावरे एकत्रित होऊ देऊ नये तसेच त्यांची मिरवणूक वगैरे प्रकार करण्यात येऊ नयेत यासाठीच्या पोलिस यंत्रणे मार्फ़त सूचना देण्यात याव्यात असे तालुका पशुधन विकास अधिकारी यांनी कलविले आहे. त्यामुळे उद्या गुरुवार दि.१४ सप्टेंबर रोजी होत असलेल्यां बैल पोळा सणावर लम्पीचे सावट आले आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!