भेंडा:नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेल्या व तालुक्याच्या वैभव घालणाऱ्या वरखेड माळेवाडी दुमला येथे नव्याने सुरू होत असलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीचा
मिल रोलर पूजन सोहळा उद्या शनिवारी 16 सप्टेंबर रोजी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापकीय डॉक्टर ममताताई शिवतारे लांडे यांनी दिली आहे.
माजी राज्यमंत्री व स्वामी समर्थ शुगर कारखान्याचे अध्यक्ष विजयबापू शिवतरे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज चा मिल रोलर पूजन दिंनाक 16 सप्टेंबर शनिवारी
सकाळी 11 वाजता माळेवाडी दुमला येथे कारखान्याच्या परिसरात पार पडणार आहे या सोहळ्यासाठी सरलाबेट चे महंत रामगिरी महाराज, माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे व्यवस्थापिका ममताताई शिवतारे लांडे ,विनय विजयबापू शिवतरे आदी सह परिसरातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील नदीकाठच्या भाग हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची उत्पादन घेतले जाते त्यामुळे या परिसराला या इंडस्ट्रीचा मोठा फायदा होणार आहे या कारखान्याच्या निर्मितीमुळे ऊस उत्पादनही वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा
आर्थिक स्तर उंचावणारा असल्याची तालुका व तालुक्यात बाहेरील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना कामधेनू ठरणार असल्याचा विश्वास व्यवस्थित पिका ममता शिवतारे यांनी व्यक्त केला आहे दैनंदिन चार हजार टन उसाची गाळप क्षमता असलेल्या स्वामी समर्थ
कारखान्याच्या डिसेंबरमध्ये सुरू करणार असल्याची त्या म्हणाल्या तसेच शेतकऱ्यांच्या उसाला इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
मिलर पूजन सोहळ्यानिमित्त परिसरातील शेतकरी व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.