Thursday, October 5, 2023

शेण व गोमूत्रावरील पदार्थांना बाजारमूल्य मिळवून देण्यासोबतच प्रचार-प्रसारासाठी कार्य करणार महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सदस्यांचा निर्धार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय पुण्यातील औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये दिनांक २ सप्टेंबर रोजी सुरु झाले. नुकतीच आयोगाच्या सदस्यांची पहिली सभा संपन्न झाली. सभेमध्ये प्रामुख्याने गोसंगोपन, गोसंवर्धन,

गोसंवर्धन, गोमय मूल्यवंर्धन म्हणजेच शेण व गोमूत्र यावरील पदार्थांना चांगले बाजारमूल्य मिळवून देण्याकरिता प्रयत्न राहणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आयोगाच्या

सदस्यांच्या पहिल्या सभेला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, सनथकुमार गुप्ता, संजय भोसले, दीपक भगत, डॉ. नितीन माकंर्डेय, उद्धव नेरकर यावेळी उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, गोसेवेच्या बाबत घटनेप्रमाणे जे जे काम सांगितले आहे, ते काम पुढे नेण्याचा सर्व सदस्य प्रयत्न करणार आहेत. गोसेवा आयोगावर मोठी जबाबदारी आहे. ती उत्तमपणे पार पाडण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, गोवंश सेवा आणि संवर्धन करणा-या कार्यकर्त्यांचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गोसेवा करताना अनेक गोसेवकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे त्यांना आयोगाकडून आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे.

तसेच आॅक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रमुख गोरक्षकांनी सभा गोसेवा आयोगाच्या पुण्यातील कार्यालयामध्ये होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!