भेंडा/नेवासा
ज्ञानेश्वर साखर कारखान्यासह विविध संस्था स्थापन करून लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी शेतकरी, कष्टकरी, तरुणांना स्वत:च्या पायावर उभे केले.समाजाच्या हिताकरिता,
समाजाच्या सुखासाठी त्यांनी अपार कष्ट उपसले असे प्रतिपादन श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.अभंग बोलत होते.
प्रारंभी ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
श्रीसंत नागेबाबा देवस्थानाचे अंकुश महाराज कादे,
रामनाथ महाराज काळेगावकर, शिवशाहीर कल्याण काळे,
बाळकृष्ण महाराज सुड़के,मछिन्द्र महाराज भोसले, नवनाथ महाराज काळे,अनिल महाराज गरुड,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,भाऊसाहेब मोटे,दिलीपराव लांडे, काशिनाथ नवले,जनार्दन पटारे,दिलीप मोटे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, भय्यासाहेब देशमुख, दत्तात्रय खाटीक,अड.बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब नवले, दत्तात्रय काळे,तुकाराम मिसाळ,अजित मुरकुटे, डॉ.शिवाजी शिंदे,अशोक वायकर,गणेश गव्हाणे,सोपानराव महापूर,संजय कोळगे, नंदकुमार पाटील,संजय फडके,रामभाऊ जगताप,देवीदास पाटेकर,कल्याण नेमाने, मंगेश थोरात,शिवाजी गवळी,मधुकर वावरे, माधव काटे,बाळासाहेब ताठे,बंडू बोरूडे,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,बबनराव भुसारी,मच्छीन्द्र म्हस्के,शिवाजी कोलते,अशोकराव मिसाळ,पंडितराव भोसले,प्रा.नारायण म्हस्के, गोरक्षनाथ गंडाळ,भाऊसाहेब कांगुणे,जनार्धन कदम,शिवाजी कोलते,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,विष्णू जगदाळे,सुखदेव फुलारी,संभाजीराव माळवदे,अण्णासाहेब गर्जे,नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे,पैस उद्योग समुहाचे अध्यक्ष शिवाजीराव पाठक, मारुतराव घुले पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,अंबादास कळमकर,रामभाऊ पाउलबुद्धे, बाजीराव मुंगसे, जालिंदर विधाटे, रामनाथ राजपुरे,राजाजी बुधवंत, अरुणराव लांडे, रावसाहेब कांगुने,अनिल मते,कॉ. बाबा आरगडे,बापूसाहेब नजन,मंहमद आतार आदि उपस्थित होते.
जयंती निमित्त गायनाचार्य रामेश्वर महाराज देशमुख यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.