Thursday, October 5, 2023

भेंडा येथील नागेबाबा मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी ३० लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजूरी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील २० देवस्थानच्या २८५ लाख रूपयांच्या निधिला मंजूरी मिळाली असून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री संत नागेबाबा मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ३० लाख रुपये निधी ला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.

शेवगाव-पाथर्डीचे तत्कालीन आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांचे पाठपुरावा करून भेंडा येथील नागेबाबा मंदिराचा “ब”-वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून घेतला.त्यामुळे २ कोटी रूपयाचा निधी मिळविला होता. भक्तनिवास इमारतीसाठी नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी जमीन दान दिली.त्यामुळे नागेबाबा भक्त निवासाची भव्य इमारत उभी राहु शकली.
नागेबाबा मंदिर व परिसर विकासाची आजुन अनेक कामे बाकी आहेत.

नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय काळे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे मंदिर व भक्त निवास परिसरात पेवर ब्लॉक बसवीने व सुशोभोकरन करने करीता निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला.त्याला यश मिळून
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत नागेबाबा मंदिर परिसर सुशोभिकरनासाठी ३० लाख रूपयांच्या निधिला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.

जिल्ह्यातील २० देवस्थानच्या २८५ लाख रूपयांच्या निधिला मंजूरी…

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय मान्यता देऊन सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत निधी मिळालेले जिल्ह्यातील देवस्थान असे…..

श्री.महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट, ताहाराबाद (३० लाख),श्री.क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट माजरसुंबा(५ लाख),श्री सदगुरू गंगागिरीजी महाराज संस्थान, सरलाबेट(२० लाख),
श्रीक्षेत्र अड़बंगनाथ देवस्थान,भामाठान(१० लाख),
श्री.विठ्ठल रुख्मिणी देवस्थान ट्रस्ट, नाऊर(५ लाख),श्री.बिरोबा मंदिर देवस्थान, धांदरफळ खुर्द( २० लाख), प.पु.अमरगिरी महाराज खानेश्वर देवस्थान, सायखिंड(७.५० लाख),श्री.रेणुकामाता देवस्थान, पारेगांव बुद्रुक ( ७.५० लाख),श्रीक्षेत्र रानमाळ, उंचखडक बुद्रुक (१५ लाख),श्री.शेषनारायण देवस्थान, कुंभेफळ(१० लाख), श्री.केळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट, केळी रुम्हणवाडी ता. अकोले(१० लाख),श्री.सिध्देश्वर (महादेव) महाराज देवस्थान, आढळगांव ता. श्रीगोंदा(१० लाख),श्री.आनंदाश्रम स्वामी देवस्थान, सुरेगांव ता.श्रीगोंदा (१० लाख), श्री.अंबिका माता देवस्थान, वांगदरी ता.श्रीगोंदा(१० लाख), श्री चांडेश्वर देवस्थान, चांडगांव ता.श्रीगोंदा(१० लाख),श्री.नरहीर नृसिंह देवस्थान, कान्हेगाव ता. कोपरगांव(२० लाख),श्री.लिंबाजी महाराज देवस्थान,निंबे, ता.कर्जत(२० लाख),श्री.रामेश्वर मंदिर देवस्थान, वारी ता. कोपरगांव(१५ लाख), श्री.भैरवनाथ देवस्थान, शिऊर ता. जामखेड(२० लाख),श्रीसंत नागेबाबा गोसावीचे देऊळ, भेंडा बु ता. नेवासा(३० लाख)

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!