पुणे
साखर आयुक्त शेखर गायकवाड व साखर सहसंचालक मंगेश तिटकरे यांच्या “इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी” या महाग्रंथाचे प्रकाशन शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते झाले.
“इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी” या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे अनावरण शुक्रवार दि.१५ सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था मांजरी येथे झाले.
हे पुस्तक भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहसंचालक साखर
मंगेश तिटकारे, यांनी लिहिले आहे.
या कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील , विजयदादा मोहिते पाटील , माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी मंत्री जयंतराव पाटील , माजी मंत्री राजेश टोपे , साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि वसंतदादा साखर संशोधन संस्थेचे सदस्य उपस्थित होते.