अहमदनगर
सध्या पाण्याच्या भीषण प्रश्न चालू आहे. माणसे ज्या ठिकाणीहून पाणी मिळेल त्याठिकाणी पाणी घेत आहेत. मग ते पाणी शुद्ध असो किंवा अशुद्ध असो परंतु स्नेहालय यांनी बालकांची काळजी घेऊन पाण्याच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रेमजल जलशुद्धीकरण यंत्रणाने मुलांचे आरोग्य उत्तम राहील, अशी प्रतिपादन स्नेहालयाचे पालक प्रकाश आपटे यांनी केले.
स्नेहालय येथे दि. 11 सप्टेंबर रोजी प्रेमजल जल शुद्धीकरण यंत्रणाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रकाश आपटे माणसे शुद्ध पाणी घेत आहेत. स्नेहलयाचे अध्यक्ष संजय गुगळे, राजीव गुजर सचिव, मानद संचालिका सपना भाभी असावा, ऑपरेशन विभाग संचालक अनिल गावडे, निवासी व अनुदानित प्रकल्पाचे संचालक प्रवीण मुत्याल, अशोक अकोलकर, गीता कौर आणि चंद्रकांत शेंबडे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की स्नेहालय नेहमी बालकांच्या समस्यांवरती वेगवेगळे उपाय शोधून कामे करतात. त्यामुळे बालकांचे कला गुण कौशल्य वाढीस लागतात.
स्नेहलयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, या स्नेहस्पर्श प्रकल्पात 2020 पासून मुले राहिला आलीत. त्या ठिकाणी लाईट, पाणी, रस्ता, आणि जेवणाची खूप समस्या होते. परंतु त्यावर आम्ही हळूहळू काम करत त्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आज प्रेमजल जलशुद्धीकरण यंत्रणा हा त्याचाच एक भाग आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन महाजन यांनी केले तर उपस्थित यांचे आभार प्रशांत बाविस्कर यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी श्याम चव्हाण, माऊली वाघ, प्रशांत बाविस्कर, पल्लवी सरदारे, कौशल्या शेंबडे , सुजाता मासुळे , मंगल गाडे, प्रवीण राठोड, आशिष सरदारे आदींनी प्रयत्न केले.